|| धनंजय रिसोडकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आठवडय़ाची मुलाखत : सोमदेव देववर्मन, टेनिस
टेनिसमध्ये लिएंडर पेसपासून युकी भांबरी, प्रज्ञेश, रामनाथनपर्यंत आलेले सर्व खेळाडू हे स्वकष्टाने पुढे आले आहेत. टेनिसमध्ये अगदी ९० च्या दशकापासून सुनियोजित यंत्रणेचा अभाव असून संघटन निष्क्रीय आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये असणाऱ्या अकादम्या तर केवळ खेळाडूंची संख्या वाढवून कमाई करण्याच्या मागे आहेत. या अकादम्यांमध्ये कुठेही गुणवत्तेवर भर दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू नसले तरी या अकादम्यांचा धंदा मात्र तेजीत आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून सातत्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसत नसून टेनिस संघटनेची कोणतीही यंत्रणा त्यासाठी कार्यरत नसल्याचे हे चित्र दुर्दैवी आहे, अशा शब्दांत भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मनने भारतीय टेनिसमधील सद्य:स्थितीवर ताशेरे ओढले.
नेरुळमधील एसएफए स्पर्धा पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सोमदेवने मोकळेपणाने आपली मते मांडली. टेनिसशी निगडित अनेक मुद्दे तसेच भारतीय टेनिस संघटनेच्या यंत्रणेवरही त्याने रोखठोकपणे भाष्य केले.
- टेनिसच्या यंत्रणेत नेमके काय चुकतेय, असे तुला वाटते?
प्रशिक्षणाची यंत्रणा चांगली नाही. आयटीएफ प्रशिक्षित प्रशिक्षकांची संख्या वाढली म्हणून भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची संख्या किंवा त्यांचा स्तर खूप वाढल्याचे दिसतेय का? खेळाडूंसाठी खूप काही चांगले होताना दिसत नाही. गेल्या दोन-तीन दशकांत असे काहीच घडलेले नाही. त्यामुळे तीन दशकांपासून भारतीय टेनिसमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे टेनिसच्या संपूर्ण प्रणालीत काही चांगले घडत असेल, तर तुम्हीच मला सांगा.
- टेनिसमध्ये वर्षांनुवर्षे तेच प्रश्न कायम आहेत, असे का?
एखाद्या उगवत्या खेळाडूची सव्र्हिस चांगली नसेल तर त्याने कुठे जावे? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही. भारतात अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. मग खेळाडूंना खासगी प्रशिक्षक शोधावे लागतात. आणि बहुतांश वेळा त्यांच्याकडून प्रचंड रक्कम आकारली जाते. ती बहुतांश जणांना शक्य नसते. गुणवान खेळाडू घडवण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड ज्ञान असायला हवे. तसेच खेळाडूंना तशा प्रकारची प्रेरणा द्यायला हवी. आपल्या संघटनेकडे खूप गुणवान किंवा या खेळातील जाणकार पदाधिकारी आहेत, असे मला वाटत नाही. संघटना वर्षांनुवर्षे एककल्ली कार्यक्रमानुसार कार्यरत असून त्यात किंचितही फरक पडलेला नाही, हीच खरी समस्या आहे.
- गोपीचंद किंवा प्रकाश पदुकोण यांनी बॅडमिंटनमध्ये जे करून दाखवले, तसे प्रयत्न टेनिस संघटना किंवा अन्य कुणी करीत आहे का?
नाही. गोपी सर किंवा प्रकाश सरांनी बॅडिमटनमध्ये जे केले ते खरोखरच स्तुत्यनीय आहे. पण टेनिसबाबत एका वाक्यात सांगायचे तर असे प्रयत्न खरेच होताना दिसत नाहीत. मी जर संघटनेचा अध्यक्ष असतो, तर टेनिस देशभरात सर्वत्र कसे पोहोचेल, हा विचार सर्वप्रथम केला असता. सर्वप्रथम टेनिस कोर्ट उभारणे, शालेय स्तरावर त्याचा अधिकाधिक प्रसार करणे ही जबाबदारी पार पाडली असती. जर संघटना त्याबाबत गांभीर्याने विचार करणारी असती, तर बरेच काही चांगले घडू शकले असते.
- कोणत्या प्रकारे प्रयत्न करायला हवेत, असे तुला वाटते?
सर्वप्रथम भारतात खेळाची संस्कृती अधिकाधिक प्रमाणात विकसित व्हायला हवी. खेळाडू दहावीनंतर टेनिसला अलविदा करतात, हे वास्तव आहे. युरोपीय देशांमध्ये खेळांची संस्कृती रुजली आहे, त्यामुळेच तिथे प्रत्येक खेळामध्ये एकापाठोपाठ नवीन खेळाडू पुढे येतात. मात्र आपल्या शाळांमध्ये मुलांना केवळ अभ्यासालाच महत्त्व द्यायला शिकवले जाते, त्याबाबतदेखील विचार व्हायला हवा. भारतातून मोठे खेळाडू पुढे आले नाही, तरी किमान आपला देश हा तंदुरुस्त नागरिकांचा बनू शकेल. त्यामुळे खेळाची संस्कृती विकसित करण्यापासून टेनिससाठी नियोजनबद्धपणे विकासाची योजना आखून त्यानुसार अंमलबजावणी करायला हवी, असे मला वाटते.
dhananjayrisodkar@expressindia.com