|| धनंजय रिसोडकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आठवडय़ाची मुलाखत : किदम्बी श्रीकांत, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

यंदाच्या वर्षभरात स्पर्धाचे व्यग्र वेळापत्रक आणि त्यात आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचीही भर पडलेली असल्याने फारसा वेळ मिळाला नाही. या थकवणाऱ्या वेळापत्रकाचा परिणाम खेळावर होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी यश मिळाले आहे. मात्र पुढील वर्षी नियोजनबद्ध खेळावर भर देणार आहे, असा विश्वास भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने व्यक्त केला.

अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या नियमानुसार खेळाडूंनी वर्षभरात १२ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. त्यात यंदा अधिकच भर पडल्याचे श्रीकांतने नमूद केले. मुंबईत प्रारंभ झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाश्र्वभूमीवर बेंगळूरु रॅप्टर्स संघाचा कर्णधार श्रीकांतशी लीगमधील आव्हाने आणि आगामी वाटचालीविषयी केलेली खास बातचीत-

  • आशियाई, राष्ट्रकुल आणि वर्ल्ड टूर फायनल्स वगळता यंदा भारतीय खेळाडूंना फारशी चमक का दाखवता आली नाही?

कोणत्याही खेळाडूच्या यशस्वी बनण्यात त्याच्या खेळातील प्रगती, वेळ आणि विश्रांती या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे व्यग्र वेळापत्रकात प्रत्येकाला अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागते. चित्त स्थिर ठेवून खेळणे जमले तरच विजयात अधिकाधिक सातत्य साधता येते. त्यात काही वेगळे झाले तर तेवढेच यश साधले जाऊ शकत नाही. तसेच भारतीय बॅडमिंटनपटूंनी मिळवलेले आशियाई आणि राष्ट्रकुलमधील यशसुद्धा लक्षात घ्यायला हवे.

  • अव्वल किंवा मातब्बर खेळाडूंविरोधात खेळताना तू कसा विचार करतोस आणि अशा सामन्यांची तयारी कशा प्रकारे करतोस?

मला बहुतांश वेळा मातब्बर खेळाडूंचा सामना करावा लागत असल्याने ते डोक्यात ठेवूनच नियोजनबद्धपणे खेळण्यासाठी मी मैदानावर येतो. तसेच प्रत्येक क्षणी जो सामना खेळत असेन, त्याचाच विचार करतो. अन्य कोणत्याही बाबीचा विचार मनात येऊ देत नाही. तयारी ही प्रत्येक सामन्याच्या पूर्वी जशी करतो, तशीच या सामन्यासाठीदेखील करतो.

  • यंदाच्या ‘पीबीएल’मध्ये तुझा बेंगळूरु संघ कशा प्रकारची कामगिरी करेल, असे वाटते?

यंदाच्या पीबीएलमध्ये एका नवीन संघाचा समावेश करण्यात आल्याने स्पर्धेची रंगत अजून वाढणार आहे. तसेच प्रत्येक पर्वानुसार खेळाच्या दर्जातही सकारात्मक फरक पडत चाललेला दिसत असून यंदा दर्जा अजूनच वरचढ असेल, अशी मला खात्री वाटते. मी यंदा पुन्हा बेंगळुरूकडून खेळत असल्याने घरी परतल्यासारखेच वाटते आहे. बी. साईप्रणीत आणि मिथुन मंजुनाथ यांच्यासह अन्य खेळाडूदेखील चांगल्या लयीत असल्याने आम्ही अन्य कोणत्याही संघाशी तुल्यबळ लढत देऊ, असा विश्वास वाटतो.

  • ‘पीबीएल’च्या व्यासपीठाचा भारतातील बॅडमिंटनला फायदा होतो, असे तुला वाटते का?

भारतीय बॅडमिंटनला सर्वाधिक फायदा या लीगमुळेच होत आहे. नवनवीन खेळाडूंना थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंशी सामना खेळण्याची मिळणारी संधी ही खूप महत्त्वाची आहे. जगभरातील अव्वल बॅडमिंटनपटूंशी संवाद साधणे आणि त्यांचा खेळ बघून आपल्या खेळात प्रगती साधणे, प्रत्येक उदयोन्मुख खेळाडूला शक्य होत आहे.

  • भारतात बॅडमिंटनचा प्रसार अधिक वेगाने आणि सुनियोजितपणे होण्यासाठी काय करायला हवे?

गेल्या दशकभरात देशात बॅडमिंटनचा खूप चांगल्या प्रकारे प्रसार होत आहे. स्पर्धाची निवड प्रक्रियादेखील अत्यंत काटेकोर होत असून त्याबाबत राष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेला धन्यवाद द्यावे लागतील. कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तरावर क्रमवारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रतिभावान खेळाडूला त्याच्यातील कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी मिळते. हे आम्ही खेळण्यास प्रारंभ केला, तेव्हा इतके सुरळीतपणे होत नव्हते. मात्र आता त्यात खूप चांगला फरक पडल्यामुळे भारतीय बॅडमिंटनचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास वाटतो.