Virat Kohli Vande Mataram Singing Plan Video Viral : टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर बार्बाडोसमध्ये ४ दिवस अडकून टीम इंडिया भारतात परतली, तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण देशाने मिळून हा विश्वचषक विजय साजरा केला. यानंतर टीम इंडियाने मुंबईत विजयी परेडही काढली. वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण टीम इंडियाचा गौरवही करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी वानखेडेवर प्रेक्षकांसोबत वंदे मातरमचे गायनही केले. यादरम्यान विराट कोहली पूर्ण उत्साहात वंदे मातरम गाताना दिसला. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की कोहलीने संघातील खेळाडूंसह प्रेक्षकांसह वंदे मातरम गाण्यासाठी आधीच तयारी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन व्हिडीओ आला समोर –

वानखेडे स्टेडियमच्या प्रेक्षकांसह टीम इंडियाने वंदे मातरम गाऊन विजयी परेडचा समारोप केला. यावेळी सर्व खेळाडू प्रेक्षकांसोबत वंदे मातरम गाताना दिसले. ज्यामध्ये विराट कोहली आणि हार्दिक पंड्या आघाडीवर दिसत होते. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली वंदे मातरम गाण्यापूर्वी इतर खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, कोहली प्रेक्षकांसह वंदे मातरम गाण्याची तयारी करत होता.

विषेश म्हणजे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश विनामूल्य होता. त्यामुळे विश्वविजेत्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये जमले होते. भारतीय संघाचा ताफा ९ वाजण्याच्या सुमारास स्टेडियममध्ये दाखल झाला असला तरी वानखेडे स्टेडियम मात्र तीन वाजताच भरले होते. विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर मोटा जल्लोष करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने आपले विचार मांडले. तसेच विराट कोहलीने सांगितले की विश्वचषक जिंकणे हे संघाचे संयुक्त ध्येय होते. त्याचवेळी आयपीएलमध्ये जाहीर टीकेचा सामना करणाऱ्या हार्दिक पंड्यावरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.

हेही वाचा – WCL 2024 : ४४व्या वर्षी ख्रिस गेलचा झंझावात; चौकार-षटकारांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल

वानखेडे स्टेडियमवर विराट-रोहितसह टीम इंडियाने केला डान्स –

विजय परेड संपवून वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व भारतीय संघाने एकत्र डान्स केला , ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट-रोहित चालता चालता दोघेही नाचू लागले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यापासून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्यावर रोहित शर्मानेही थोडा डान्स केला. तो हॉटेलबाहेर नाचताना दिसला.

हेही वाचा – ‘हार्दिकचे ते शब्द मी कधीच विसरणार नाही…’, पंड्याबद्दल इशान किशनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यांतील…’

विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय केला अलविदा –

टी-२० विश्वचषक २०२४ ही स्पर्धा विराट कोहलीसाठी तितका खास नव्हता, जितका चाहत्यांना आणि कोहलीला अपेक्षित होता. अंतिम सामना वगळता कोहलीला या स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अनेक वेळा कोहली शून्यावरही बाद झाला. मात्र, अंतिम सामन्यात कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looks like it was virat kohlis plan to sing vande mataram with the wankhede crowd video viral vbm
Show comments