शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या वेगवान संघर्षांत मुंबईच्या दोन्ही संघांना खो-खो प्रीमियर लीगच्या सकाळच्या सत्रात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, मात्र सायंकाळचे सत्र दोन्ही संघांना फलदायी ठरले. सकाळी मुंबई रायडर्सना अहमदनगर हीरोजकडून १६-१५ तर सबर्बन योद्धाजला पुणे फायटर्सविरुद्ध त्याच फरकाने निसटता पराभव सहन करावा लागला होता. या दोन्ही मुंबईकर संघांनी सायंकाळी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर सहजगत्या मात केली. मुंबई रायडर्सने पुणे फायटर्सवर २मिनिटे ५० सेकंद राखून १३-१२ अशी  मात केली. तसेच सबर्बन योद्धाजनेही एक मिनिट आधी विजय नोंदविताना सांगली स्मॅशर्सचा १४-१३ असा पराभव केला. दुसऱ्या दिवसाचा एक सामना बाकी असता अहमदनगर हीरोज, मुंबई रायडर्स, ठाणे थंडर्स हे प्रत्येकी दोन सामने जिंकून चार गुणांसह आघाडीवर होते.
गुंता ग्रुप आणि डी.डी.अ‍ॅडव्हर्टायझिंगने आयोजित केलेल्या केकेपीएलच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने पुण्याविरुद्ध सुनील मोरेचा अष्टपैलू खेळ आणि मनोज वैद्य, कुशल शिंदेच्या चांगल्या बचावामुळे मध्यंतराला ९-५ अशी आघाडी घेतली आणि तीन मिनिटे राखून ही लढत जिंकली. पुण्याचे संतोष वाडेकर याचा अष्टपैलू आणि मायाप्पा हिरेकुर्बेचे संरक्षणही त्यांचा पराभव टाळू शकले नाही. सबर्बनने आपल्या गुणांचे खाते उघडताना सांगली स्मॅशर्सचा ७-७ अशा बरोबरीनंतर दुसऱ्या डावात एक मिनिट आधीच विजयावर  शिक्कामोर्तब केले. सबर्बनच्या नचिकेत जाधवने अफलातून बचाव करीत १ आणि २मिनिट १० सेकंद किल्ला लढवला. त्याला रमेश सावंत आणि रुपेश खेतले यांचीही साथ लाभल्यामुळे त्यांना आपला पहिला विजय  साजरा करता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा