संघातील सपोर्ट स्टाफला मानधनाची हमी मिळणेबाबत आपण श्रीलंका क्रिकेट मंडळास लिहिलेल्या गोपनीय पत्रातील मजकूर प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचल्यामुळे मंडळावरील माझा विश्वास उडाला आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने याने येथे सांगितले.
आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धेच्या वेळी जयवर्धने याने संघातील सपोर्ट स्टाफला मानधनाची हमी देणेबाबत सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रातील मजकूर येथील काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे जयवर्धने अतिशय नाराज झाला. तो म्हणाला,‘‘ केवळ मीच नव्हे, तर आमच्या संघातील खेळाडूही खूप नाराज झाले आहेत. मी मंडळाकडे केलेली विनंती फेटाळण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच, मी काय मागणी केली होती याचीही माहिती काही वृत्तपत्रांनी दिल्यामुळे मंडळाच्या कारभारात किती ढिसाळपणा आहे हे स्पष्ट होते. स्पर्धेच्या संयोजनाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंका मंडळास निधी दिला होता. या निधीपैकी २५ टक्के रक्कम आमच्या खेळाडूंना देण्यात येणार होती. या रकमेपैकी काही रक्कम सपोर्ट स्टाफला द्यावी असे आम्ही ठरविले होते व त्यानुसार मी मंडळास गोपनीय पत्र लिहून विनंती केली होती.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा