‘‘सचिन तेंडुलकर आता भारतीय संघासोबत नसेल, ही गोष्ट पचनी पडत नाही, कारण त्याने आम्हाला बऱ्या गोष्टी शिकवल्या. तो आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आणि आदर्शवत होता. त्यामुळे तो आता संघात नसेल ही भावना वेदनादायी असेल. या साऱ्यामधून आम्हाला बाहेर पडायला हवे, पण ते फार कठीण आहे,’’ असे मत पदार्पणाच्या कसोटी मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या रोहित शर्माने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तो पुढे म्हणाला की, ‘‘सचिनकडून मला बरेच मार्गदर्शन मिळाले आणि त्याचा फायदाही झाला. २००८ सालची ऑस्ट्रेलियामधील व्ही. बी. मालिका असो किंवा २०१० मधील दक्षिण आफ्रिकेतील सामने असो. परदेशातील गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर तयारी कशी करायची, हे त्याच्याकडून शिकलो. तो नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहिला आणि यापुढेही कायम राहील, हा विश्वास आहे.’’
सचिन तेंडुलकरला अखेरच्या सामन्यात शतक झळकावता आले नाही, याबाबत विचारल्यावर रोहित म्हणाला की, ‘‘अखेरच्या सामन्यात शतक व्हावे, ही त्याची, माझी, साऱ्यांचीच इच्छा होती, परंतु तो ७४ धावांवर बाद झाला आणि सर्वानाच  दु:ख झाले. पण शतक झाले नसले तरी गेल्या २४ वर्षांमधील त्याची देदीप्यमान कामगिरी आपल्याला विसरता येणार नाही.’’
पदार्पणाच्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावल्यानंतर रोहित म्हणाला की, ‘‘या मालिकेत माझ्याकडून चांगली कामगिरी झाली असली तरी या खेळीमुळे संघाच्या विजयात योगदान देता आले, याचा आनंद जास्त आहे.’’