चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी आयपीएल मध्ये चेन्नई संघाने दाखविलेल्या उत्तम कामगिरीबद्दल बोलत असताना संघ निवड प्रक्रियेत विश्वासार्हता हाच चेन्नईच्या विजयी वाटचालीचा एकमेव मंत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच उत्तम सांघिक कामगिरीमुळे चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला असल्याचे फ्लेमिंग म्हणाले.
“संघनिवडताना सामंजस्यपणा आणि विश्वसार्हता आम्ही बाळगली. तसेच संघातील खेळाडूंमधील उत्तम ताळमेळ, खेळाडूंच्या खेळाचा दर्जा, योग्य समन्वय या सर्व गोष्टीत चेन्नई अव्वल आहे. गेल्या सहा वर्षांपासून संघात सारखेपणा राखला गेला यात आम्ही खरचं नशीबवान आहोत. आयपीएलच्या प्रत्येक पर्वात आम्ही उपान्त्य आणि पाचव्यांदा अंतिम फेरीत आहोत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यानुसार संघ पुढील सामन्यातही उत्तम कामगिरी करेल” असे स्टिफन फ्लेमिंग यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Story img Loader