Babar Azam video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या लंका प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त फलंदाजी करत आहे. अलीकडेच त्याने शतक झळकावून आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. मॅचनंतर बाबरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाबर म्हणत आहेत की, भाऊ लवकर कर, दुआ (नमाज)ची वेळ संपत आहे. वास्तविक बाबर आझम सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना तो म्हणाला की, “भाई लवकर कर, नमाजाची वेळ होत आहे.” (जल्दी करो दुआ का वक्त निकल रहा है) बाबरच्या व्हिडीओची ही क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबरने १०वे टी२० शतक झळकावले

लंका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळणाऱ्या बाबर आझमने ५९ चेंडूत १०४ धावांची तुफानी खेळी केली. बाबरचे टी२० क्रिकेटमधील हे १०वे शतक आहे. यासह, या फॉरमॅटमध्ये १० शतके झळकावणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. या विक्रमांच्या यादीत वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल बाबरच्या पुढे आहे.

बाबर आझम लंका प्रीमियर लीगच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने लीगमध्ये आतापर्यंत २११ धावा केल्या आहेत. या मोसमातील चार डावांमध्ये बाबरचा स्ट्राईक रेट १५०च्या आसपास आहे आणि त्याची फलंदाजीची सरासरी ५०च्या वर आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, बाबर आझमने सामना जिंकणारे शतक झळकावून आपल्या संघाला १८९ धावांचे लक्ष्य एक चेंडू बाकी असताना गाठले.

टी२० क्रिकेटमध्ये १० शतकांचा आकडा गाठणारा बाबर जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय केवळ वेस्ट इंडिजच्या गेलने हा पराक्रम केला आहे. ४३ वर्षीय गेलने टी२० क्रिकेटमध्ये एकूण २२ शतके झळकावली आहेत. कोहली, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर सर्वाधिक टी२० शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. चौघांनीही आतापर्यंत अनुक्रमे ८-८ शतके केली आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककमल आणि इंग्लंडचा ल्यूक राइट यांनी प्रत्येकी सात शतके झळकावली आहेत. के.एल. राहुल, क्विंटन डी कॉक, रिली रोसो, जेसन रॉय, शेन वॉटसन, जोस बटलर आणि रोहित शर्मा प्रत्येकी सहा शतकांसह संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा: Shikhar Dhawan: “वर्ल्ड कप जिंको की न जिंको पण पाकिस्तानविरुद्ध….”, शिखर धवनच्या वक्तव्यावर चाहते संतापले

कोलंबो स्ट्रायकर्स आणि गॅले टायटन्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलताना बाबरने पथुम निसांकासोबत पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. तबरेझ शम्सीने १३व्या षटकात निसांकाला डॅनियलच्या हाती झेलबाद केले. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. बाबरने नुवानिडू फर्नांडो (८) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. फर्नांडो १८व्या षटकात शम्सीचा बळी ठरला. रजिताने टाकलेल्या शेवटच्या षटकात कोलंबोला विजयासाठी १४ धावांची गरज होती आणि बाबरला पहिल्याच चेंडूवर शाकीब अल हसनने झेलबाद केले. अशा परिस्थितीत मोहम्मद नवाजने कोलंबोला रवाना केले. त्याने षटकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpl jaldi karo dua ka time nik raha hai babar azams video is going viral avw
Show comments