Justin Langer appointed as LSG coach: आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) एक मोठी घोषणा केली आहे. एलएसजी जस्टिन लँगरला आपल्या संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. याआधी, अँडी फ्लॉवर सुरुवातीच्या दोन हंगामात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता, ज्यांच्या रवानगीची देखील फ्रँचायझीच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती देण्यात आली होती. त्याच वेळी, जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची माहिती देखील फ्रँचायझीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँडी फ्लॉवरचा लखनऊ फ्रँचायझीसोबत दोन वर्षांचा करार होता, जो या वर्षीच्या हंगामाच्या शेवटी संपला. त्याचबरोबर, जस्टिन लँगर सध्या कोणत्याही संघासाठी प्रशिक्षक म्हणून करारात नाही. जस्टिन लँगरने २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून देण्यात प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जस्टिन लँगर कोण आहे?

जस्टिन लँगर हा ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फलंदाज आहे. त्याने १०५ कसोटीत ४४.७४ च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या आहेत. त्याने तीन द्विशतके, २३ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत. या खेळाडूने ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६० धावा केल्या आहेत. जस्टिन लँगर यांनी २०१८ मध्ये सँडपेपरच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर, त्याच्या कार्यकाळात टी-२० विश्वचषक जिंकण्याबरोबरच, संघाने अॅशेस मालिकेत इंग्लंडचा ४-० ने पराभव केला होता.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: टीम इंडियाला अजिंक्यच्या रुपाने चौथा धक्का, भारताकडे २५० धावांची आघाडी

लखनऊचा संघ दोन्ही हंगामात प्लेऑफमधून बाहेर पडला –

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत दोन आयपीएल हंगाम खेळले आहेत. दोन्ही हंगामात संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला होता, परंतु संघाचा प्रवास एलिमिनेटर सामन्यातच संपुष्टात आला. सध्या भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg has appointed justin langer as its new coach for upcoming ipl seasons vbm