पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचे माजी फुटबॉलपटू लुइस फिगो फिफा अध्यक्षपदाच्या लढतीत सेप ब्लाटर यांना आव्हान देणार आहेत. ४२ वर्षीय फिगो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘‘मला फुटबॉल खेळाची काळजी आहे. त्यामुळे फिफाची प्रतिमा
चांगली राहावी, असे मला वाटते. सध्या आणि गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास ती चांगली राहिलेली नाही.’’
‘‘तुम्ही जर फिफा या नावाने इंटरनेटवर शोधायला गेलात तर ‘स्कँडल’ हे दुसरे शब्द पुढे येतात. हे चांगले शब्द नाहीत. फिफाची प्रतिमा सुधारण्यासाठी आपण सर्वप्रथम प्रयत्न करायला हवे आहेत,’’ असे फिगो यावेळी म्हणाले.

Story img Loader