फिफा विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर घेतलेला चावा उरुग्वेचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझला चांगलाच महागात पडला आहे. या प्रकारात दोषी आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) सुआरेझवर चार महिन्यांची बंदी घातली आहे.  मैदानावर कायम वादग्रस्त कारणांसाठी लोकप्रिय असलेला सुआरेझ पुन्हा एकदा ‘बॅड बॉय’च्या भूमिकेत दिसून आला. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सुआरेझ वादग्रस्त ठरत गेला. अनेक वादग्रस्त प्रकरणांनी सुआरेझची कारकीर्द गाजली. मैदानावर धावताना अनेक वेळा रेफ्रींना धडक मारणाऱ्या सुआरेझला स्पेनमधील ‘एल गोल डिजिटल’ने जगातील वाईट फुटबॉलपटूंमध्ये पाचवे स्थान दिले होते. सध्या त्याची लुइस ‘चावरे’झ अशीच प्रतिमा सध्या त्याची निर्माण झाली आहे. कुठल्याही खेळाचे चाहते असोत, एखाद्या खेळाडूला ते जेव्हा डोक्यावर घेतात तेव्हा त्यांच्या आनंदाला कुठलीच सीमा नसते. अशाचप्रकारे ते एखाद्या खेळाडूचा राग करायलाया लागल्यावर अथवा त्याने वाईट कृत्य केल्यावर त्याच्याबाबतीतला रागही दाखवायला मागेपुढे पाहत नाहीत. सुवारेझच्या कृत्याबाबत अशाप्रकारचे वातावरण आता सोशल मीडियावर साईट्सवर दिसून येत आहे. त्यावर टाकलेला एक दृष्टीक्षेप.   

 सुआरेझ आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना कसा पाहतो याचे गमतीशीर उदाहरण.


एका फुटबॉल चाहतीला सुआरेझच्या पोस्टरसोबत छायाचित्र काढून घेताना पोस्टरकडून चावून घेण्याचा मोह आवरला नाही.


चावणा-या सुआरोझला चाहत्यांनी मास्कही तयार करून दिला आहे.


फुटब़लमधील विविध पुरस्कारांनंतर आता हा अनोखा पुरस्कार मिळवण्याचा प्रथम मानही सुआरेझनेच मिळवला आहे. 


प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकत नसाल तर त्यांना खाऊन टाका, हा नियम सुआरेझला तंतोतंत लागू होतो. 


सुआरेझच्या चावरेपणातून मोठमोठाले ब्रॅण्डही सुटलेले नाहीत, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.


चावण्यातच मजा आहे, हे दर्शवणारे छायाचित्र काढतानाचे छायाचित्र.

 

‘ज्युरासिक पार्क’ या प्रसिध्द चित्रपटावरून ‘सुआरेझ पार्क’ हे पोस्टर बनविण्याची कल्पनाच भन्नाट म्हणावी लागेल.

 

 

 

 

 

 

Story img Loader