फिफा विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर घेतलेला चावा उरुग्वेचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझला चांगलाच महागात पडला आहे. या प्रकारात दोषी आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) सुआरेझवर चार महिन्यांची बंदी घातली आहे. मैदानावर कायम वादग्रस्त कारणांसाठी लोकप्रिय असलेला सुआरेझ पुन्हा एकदा ‘बॅड बॉय’च्या भूमिकेत दिसून आला. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सुआरेझ वादग्रस्त ठरत गेला. अनेक वादग्रस्त प्रकरणांनी सुआरेझची कारकीर्द गाजली. मैदानावर धावताना अनेक वेळा रेफ्रींना धडक मारणाऱ्या सुआरेझला स्पेनमधील ‘एल गोल डिजिटल’ने जगातील वाईट फुटबॉलपटूंमध्ये पाचवे स्थान दिले होते. सध्या त्याची लुइस ‘चावरे’झ अशीच प्रतिमा सध्या त्याची निर्माण झाली आहे. कुठल्याही खेळाचे चाहते असोत, एखाद्या खेळाडूला ते जेव्हा डोक्यावर घेतात तेव्हा त्यांच्या आनंदाला कुठलीच सीमा नसते. अशाचप्रकारे ते एखाद्या खेळाडूचा राग करायलाया लागल्यावर अथवा त्याने वाईट कृत्य केल्यावर त्याच्याबाबतीतला रागही दाखवायला मागेपुढे पाहत नाहीत. सुवारेझच्या कृत्याबाबत अशाप्रकारचे वातावरण आता सोशल मीडियावर साईट्सवर दिसून येत आहे. त्यावर टाकलेला एक दृष्टीक्षेप.
सुआरेझ आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना कसा पाहतो याचे गमतीशीर उदाहरण.
‘चावरा सुआरेझ’ सोशल मीडियावर फेमस
सध्या त्याची लुइस 'चावरे'झ अशीच प्रतिमा सध्या त्याची निर्माण झाली आहे. कुठल्याही खेळाचे चाहते असोत, एखाद्या खेळाडूला ते जेव्हा डोक्यावर घेतात तेव्हा त्यांच्या आनंदाला कुठलीच सीमा नसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-06-2014 at 04:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luis suarez famous on social media