प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना लुइस सुआरेझ याने दोन गोल केले, त्यामुळेच लिव्हरपूल संघास सुदरलँड संघावर ३-१ असा विजय मिळवता आला. या विजयासह त्यांनी साखळी गटात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सुआरेझने सुदरलँड संघाविरुद्धच्या लढतीत पूर्वार्ध व उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल केला. लिव्हरपूल संघाला डॅनियल स्टुरीज याने आघाडी मिळवून दिली होती. सुदरलँड संघाचा एकमेव गोल ईमॅन्युअल गियाचेरिनी याने केला होता. स्पर्धेतील अन्य लढतीत वेस्ट ब्रोमवीच संघाने मँचेस्टर युनायटेड संघावर २-१ असा सनसनाटी विजय मिळविला होता, तर मँचेस्टर सिटी संघाला अ‍ॅस्टॉन व्हिला संघाने ३-२ असे हरविले होते.

Story img Loader