एखाद्या खेळाडूने परदेशात पराक्रम केला की त्याच्या स्वागतासाठी देशवासीय विमानतळावर स्वागतासाठी एकच गर्दी करतात, पण उरुग्वेवासीय ‘चावे’बाज लुइस सुआरेझच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. इटलीविरुद्धच्या सामन्यात जॉर्जियो चिएलिनीला सुआरेझने चावा घेतला होता, त्यानंतर फुटबॉलच्या मैदानावरील या ‘व्हिलन’च्या कृत्याचा सर्वच थरांतून निषेध करण्यात आला. फिफानेही त्याच्यावर कडक कारवाई केली. त्यानंतर मात्र सहानुभूतीची लाट सर्वत्र पसरली आहे. दस्तुरखुद्द चिएलिनीनेच ही शिक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.
उरुग्वे हा फुटबॉलवेडय़ांचा देश. विश्वचषकात त्यांना पहिल्याच सामन्यात कोस्टा रिकाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण ‘इंग्लंडला कसे पराभूत करायचे, हे मला माहिती आहे’ असे सुआरेझने सांगितले आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळवले. या सामन्यात सुआरेझने दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला, तर त्यानंतरच्या इटलीविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला आणि उरुग्वे जिंकली, त्यामुळे सुआरेझ उरुग्वेसाठी यशदायी असल्याचे म्हटले गेले, पण इटलीच्या चिएलिनीचा ‘चावा’ घेतल्यामुळे फिफाने त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि त्यामुळेच त्याला विश्वचषक स्पर्धा सोडून मायदेशी परतावे लागले. पण मायदेशी परतण्यापूर्वी सुआरेझने त्याची कामगिरी चोख बजावली, अशी भावना उरुग्वेवासीयांच्या मनात असून ते त्याच्या स्वागतासाठी येथील कारास्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठय़ा संख्येने दाखल झाले. या वेळी बऱ्याच जणांच्या हातामध्ये सुआरेझचे स्वागत करणारे फलक आणि त्याच्या नावाचा नाद सर्वत्र घुमत होता.
सुआरेझच्या स्वागतासाठी उरुग्वेवासीय सज्ज
एखाद्या खेळाडूने परदेशात पराक्रम केला की त्याच्या स्वागतासाठी देशवासीय विमानतळावर स्वागतासाठी एकच गर्दी करतात, पण उरुग्वेवासीय ‘चावे’बाज लुइस सुआरेझच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-06-2014 at 02:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luis suarez returns to warm welcome in uruguay