बार्सिलोना आणि रिआल माद्रिद हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. बार्सिलोनाकडे लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझसारखे प्रतिभावंत खेळाडू असले तरी त्यांना तोडीस तोड उत्तर देणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि गॅरेथ बॅले हे आक्रमक खेळाडू माद्रिदकडे आहेत़ मात्र, ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत सोमवारी झालेल्या लढतीत सुआरेझ भाव खाऊन गेला़ उत्तरार्धात त्याने नोंदविलेल्या निर्णायक गोलच्या बळावर बार्सिलोनाने २-१ अशा विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला़
मेस्सी याने फ्री किकद्वारा दिलेल्या पासवर जेरेमी मथियू याने बार्सिलोनास आघाडी मिळवून दिली. मात्र रोनाल्डोने अप्रतिम गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्धातील या बरोबरीनंतर उत्तरार्धात बार्सिलोना संघाच्या खेळाडूंनी जोरदार चाली केल्या. अखेर सुआरेझ याला सूर गवसला. त्याने दानी अल्वीस याच्या पासवर खणखणीत गोल करीत बार्सिलोनास विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा