कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या स्पेन विरुद्ध केलेल्या उत्तम सांघिक शैलीवर ब्राझील फुटबॉल संघाचे प्रशिक्षक लुईस फेलिपे स्कोलरी खुष आहेत. अशीच कामगिरी ब्राझिल संघ येत्या फुटबॉल विश्वचषकातही करेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच अंतिम सामन्यात चांगल्या फरकाने ब्राझीलने विजय मिळविला असे स्पष्ट करत स्पेन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक विसेन्ते डेल बोस्क्यू यांनी खराब कामगिरीमुळे पराभव झाल्याचे म्हटले.
कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने स्पेन फुटबॉल संघावर ३-० ने विजय मिळविला आहे. यात ब्राझीलच्या फ्रेडने दोन, तर नेमारने एक गोल केला. ब्राझीलच्या या विजयामुळे येत्या फुटबॉल विश्वचषकामध्ये सुद्धा ब्राझील चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
ब्राझीलच्या विजयी शैलीवर लुईझ स्कोलरी खुष!
कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या स्पेन विरुद्ध केलेल्या उत्तम सांघिक शैलीवर ब्राझील फुटबॉल संघाचे प्रशिक्षक लुईस फेलिपे स्कोलरी खुष आहेत. अशीच कामगिरी ब्राझिल संघ येत्या फुटबॉल विश्वचषकातही करेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
![ब्राझीलच्या विजयी शैलीवर लुईझ स्कोलरी खुष!](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/07/M_Id_398094_Brazil_coach_Luiz_Felipe_Scolari1.jpg?w=1024)
First published on: 01-07-2013 at 05:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luiz felipe scolari delighted by style of brazils victory