लंडन : ल्यूटन संघाचा कर्णधार टॉम लॉकयरला यावर्षी दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानात कोसळला. यामुळे प्रीमियर लीग फुटबॉलचा सामना हा रद्द करावा लागला. लॉकयरला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्याची स्थिती स्थिर आहे. त्याचे कुटूंब त्याच्यासोबत आहे, असे त्याच्या संघाकडून सांगण्यात आले.

वेल्सचा हा बचावपटू सामन्याच्या ५९व्या मिनिटाला मैदानावर कोसळला. यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू त्याच्याजवळ पोहोचले. ल्यूटनचे प्रशिक्षक रॉब एडर्वड्स लगेच मैदानात आले. लॉकयरला मैदानात उपचार देण्यात आले व नंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्याला बाहेर नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली होती. त्यावेळी सामना १-१ असा बरोबरीत होता आणि पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द केल्यानंतरही चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. लॉकयर यापूर्वी मे महिन्या वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यादरम्यानही खाली कोसळला होता. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली व नंतर त्याला खेळण्याची परवानगी मिळाली होती.

Rohit Sharma Comeback Fifty in IND vs ENG 2nd ODI With Fours and Sixes in just 30 balls
Rohit Sharma: हिटमॅन इज बॅक! इंग्लंडविरूद्ध झंझावाती अर्धशतकासह रोहित शर्माने केलं दणक्यात पुनरागमन, पाहा VIDEO
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
Kohli misses Nagpur ODI due to right knee injury
कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्याला मुकला
IND vs ENG Fans asked Rohit Sharme retire from the ODI after he dismissed for just 2 runs in Nagpur
IND vs ENG : ‘रोहित शर्माला निवृत्ती घ्यायला सांगा…’, दोन धावांवर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी हिटमॅनला केले ट्रोल
Babar Azam Loses Phone and Contacts Shares Post on Social Media Ahead Of Champions Trophy
Babar Azam: बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे चिंतेत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
nagpur on Sunday india Vs england series first match Online ticket sales began and sold out within minutes
नागपूर : भारत वि. इंग्लंड सामना, काही मिनिटातच संपली तिकिटे…
Mahakumbh mela man walking from outside of the bridge shocking stunt video viral
“अरे, स्वत:च्या जीवाची तरी पर्वा करा”, कुंभमेळ्यात माणसाने जे केलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO एकदा पाहाच

अन्य सामन्यात, मँचेस्टर सिटीने दोन गोलची आघाडी घेऊनही क्रिस्टल पॅलेससोबत २-२ अशा बरोबरीची नोंद केली. सिटीच्या घरच्या मैदानातील सलग तिसऱ्या सामन्यांत त्यांना बरोबरीवरच समाधान मानावे लागले. तर, न्यूकॅसलने फुलहॅमवर ३-० असा विजय नोंदवला.

Story img Loader