पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. आज करुणानिधी यांचे पार्थिव चेन्नईतील राजाजी हॉल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून कार्यकर्ते पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते रजनीकांत, कमल हसन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करुणानिधी हे चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी ओळखले जात होते. मात्र त्याच्या एका आवडीबाबत फारसे बोलले गेले नाही. ती आवड म्हणजे क्रिकेट सामना पाहण्याची. माजी मुख्यमंत्री असलेले करुणानिधी हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते होते. माजी कर्णधार कपिल देव, जवागल श्रीनाथ हे त्यांचे आवडते क्रिकेटर होते. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे सामने पाहणेही करुणानिधी यांना आवडत असे. अनेकदा ते क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी चक्क आपल्या ठरलेल्या बैठका, मिटिंग आणि अपॉइंटमेंट रद्द करत असत. इतकेच नव्हे तर काही वेळा ते त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन क्रिकेटचा सामना पाहणेही पसंत करायचे.

याशिवाय, २०११ साली धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना करुणानिधी सरकारकडून ३ कोटींचे बक्षीस देण्यात आले होते. तसेच, तामिळनाडू संघाचा सदस्य असलेल्या रविचंद्रन अश्विन याला स्वतंत्रपणे १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. मी आधी कपिल देव यांचा चाहता होतो, मात्र आता मी महेंद्रसिंग धोनी याचा चाहता आहे, असे त्यांनी २०१३ साली ट्विटदेखील केले होते.

दरम्यान, करुणानिधी यांची समाधी मरीना बीचवर असणार आहे. दरम्यान चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.