लिओनेल मेस्सी याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोना संघाने चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्यांनी ए.सी.मिलान क्लबचा ३-१ असा पराभव केला.
मेस्सीला त्याआधीच्या तीन सामन्यांमध्ये एकही गोल करता आला नव्हता. त्याने मिलान संघाविरुद्ध दोन गोल करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने पहिला गोल पेनल्टी किकच्या जोरावर केला. त्याचा सहकारी नेईमीर याला इग्नाझिको अबेटे याने धक्का देऊन पाडल्यानंतर पंचांनी ही पेनल्टी किक दिली होती. सर्जिओ बुस्क्वेट्स याने बार्सिलोनाचा दुसरा गोल केला. पूर्वार्धात मिलान संघाच्या गेरार्ड पिकी याने काका याच्या पासवर संघाचा एकमेव गोल केला. उत्तरार्धात सामना संपण्यापूर्वी सात मिनिटे बाकी असताना मेस्सी याने सेझ फॅब्रिगास याच्या पासवर आणखी एक गोल करीत संघाची बाजू बळकट केली.

Story img Loader