Mady Villiers catch video viral in the hundred : इंग्लंडमधील हंड्रेड स्पर्धेदरम्यान, २५ वर्षीय मॅडी विलियर्सने एका हाताने आश्चर्यकारक झेल घेतल्याने ती चर्चेत आली. तिच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे चाहते तिची तुलना महान क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सशी करत आहेत. त्याचवेळी काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, मॅडी विलियर्स सारख्या खेळाडूंचे प्रयत्न पाहून असे वाटते की महिला क्रिकेट खूप वेगाने प्रगती करत आहे.

मॅडी विलियर्सच्या झेलबद्दल बोलायचे तर, तिने हा अप्रतिम झेल ट्रेंट रॉकेट्स विरुद्ध ओव्हल इनव्हिन्सिबल्स सामन्यादरम्यान पकडला. मॅरीझन कॅपने सामन्यातील आठवा चेंडू गुड लेंथवर टाकला, ज्यावर ट्रेंट रॉकेट्सच्या ब्रायोनी स्मिथला लेग साइडने शॉट खेळायचा होता, ज्यासाठी तिने चांगला शॉट खेळला, पण तिच्या शॉटच्या मध्ये मॅडी विलियर्स ‘सुपर वुमन’प्रमाणे आडवी आली.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

या २५ वर्षीय खेळाडूने डावीकडे डायव्हिंग करताना एका हाताने अप्रतिम झेल घेतला. तिचा हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर गोलंदाज, पंच आणि समालोचकही आश्चर्यचकित झाले. समालोचकांनी तर याला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ ऑन एअर घोषित केले.

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ८०,००० रुपयांसाठी आयपीएल २०२४ संबंधित विचारला ‘हा’ प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट रॉकेट्स संघाने १०० चेंडूत ८ गडी गमावून ९१ धावा केल्या. ओव्हल इन्व्हिन्सिबल्ससाठी मॅरिझन कॅपने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर मॅडी व्हिलियर्सने हा शानदार झेल घेण्याव्यतिरिक्त २० चेंडूत १७ धावा देत १ विकेटही घेतली. यानंतर ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स संघाने ६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. या संघाने ९४ चेंडूत ५ गडी गमावून ९२ धावा केल्या. मॅरिझान कॅप आणि पायगे स्कॉलफिल्ड यांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. मॅरिझान कॅपला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Story img Loader