डी गुकेश सध्या सुरू असलेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत चर्चेत आहे. भारताचा विश्वविजेता गुकेश हा या स्पर्धेचं मुख्य आकर्षण ठरला आहे. गेल्या महिन्यात सिंगापूरमधील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डिंग लिरेनचा पराभव करत १८ व्या वर्षी गुकेश सर्वात तरूण जगज्जेता ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा विजेतेपदाचा सामना निर्णायक चौदाव्या गेमपर्यंत पोहोचला आणि हा सामना टायब्रेकरपर्यंत जाईल असे चित्र होते. पण ५५व्या चालीमध्ये चिनी ग्रँडमास्टरने केलेल्या एका मोठ्या घोडचुकीमुळे गुकेशकडून त्याला ऐतिहासिक पराभव पत्करावा लागला. पण विजयानंतरही गुकेशला हे माहित होतं की तो जगातील सर्वाेत्कृष्ट बुद्धिबळपटू झालेला नाही आणि त्याने उघड केले की सर्वाेत्कृष्ट बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन होता.

जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसनने चॅम्पियनशिप सामन्यांपेक्षा स्पर्धांना प्राधान्य दिल्याचे सांगितले. दरम्यान, त्याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२४ च्या सायकलमध्येही सहभाग घेतला नाही. गुकेशच्या लिरेन विरुद्धच्या विजयानंतर, कार्लसनने सांगितलं होतं की, भारतीय ग्रँडमास्टरने त्याला जाहीरपणे खेळण्याचं आव्हान दिल्यानंतरही जेतेपदासाठी तो आव्हान स्वीकारणार नाही.

पण आता कार्लसनने आपला विचार बदलल्याचं दिसत आहे आणि अलीकडेच चेस 24 वर बोलताना एक मोठा खुलासा केला आहे. तो चेस 24 साठी टाटा मास्टर्सच्या काही सामन्यांचं समालोचनही करत आहे. तो म्हणाला, “माझ्याकडे टाटा स्टील चेस खेळण्याच्या छान आठवणी आहेत. हे ३ आठवडे बुद्धिबळ खेळायला येणाऱ्या खेळाडूंसाठी डिटॉक्ससारखे आहे. गेल्या काही वर्षात क्लासिकल फॉरमॅट न खेळण्याचा माझा कल झाला आहे. कदाचित या फॉरमॅटमधली माझी ही शेवटची स्पर्धा असेल.”

तो असंही म्हणाला, “जेव्हा मी या अव्वल खेळाडूंना खेळताना पाहतो तेव्हा मला नेहमी वाटतं की मीही त्यांच्याबरोबर खेळावं. पण मी सध्या प्रेक्षक म्हणून खूप आनंदी आहे. या स्पर्धेत मी जे काही साध्य केलं त्यासाठी मी खूप आभारी आहे आणि मी पुनरागमन करण्याची शक्यता नक्कीच नाकारत नाहीय.”

टाटा स्टील मास्टर्स देखील FIDE सायकलचा भाग आहेत. जर कार्लसन पुन्हा FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलमध्ये सामील झाला, तर तो जागतिक विजेतेपदासाठी गुकेशला आव्हान देईल अशी अपेक्षा आहे. पण तसे होण्यासाठी त्याला २०२६ ची कँडिडेट्स स्पर्धा जिंकावी लागेल.

या कँडिडेट्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडूंचा सामना केल्यानंतरच मॅग्नस कार्लसन गुकेशला टक्कर देऊ शकतो. पण त्यापूर्वी त्याला या कँडिडेट्स स्पर्धेत फॅबियानो कारुआना (२०२४ FIDE सर्किटचा विजेता), FIDE ग्रँड स्विस टूर्नामेंट २०२५ मधील टॉप-टू फिनिशर, २०२५ चेस वर्ल्ड कपचे टॉप-थ्री फिनिशर, २०२४ चे विजेते आणि सर्वोच्च FIDE Circuit रेटिंग असलेले खेळाडू (ऑगस्ट २०२५ पासून जानेवारी २०२६). पुढील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये होणार असून, त्यातील विजेत्या कँडिडेची लढत गुकेशशी होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magnus carlsen accepts d gukesh world chess championship challenge in cryptic statement on tata stell chess tournament bdg