नवी दिल्ली : अतिशय कमी वयात जगज्जेतेपद पटकावल्याबद्दल दोम्माराजू गुकेशचे विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू अशी ख्याती असणाऱ्या मॅग्सन कार्लसनने कौतुक केले. मात्र, त्याच्याविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत खेळण्यास स्पष्ट नकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘गुकेशचे यश खूपच खास आहे. ‘फिडे’ सर्किटमध्ये तो मागे पडत होता. मात्र, त्याने चेन्नईत झालेली स्पर्धा जिंकली आणि तो ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरला. कँडिडेट्स स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली. आता तो जगज्जेताही झाला आहे,’’ असे पाच वेळचा विश्वविजेता कार्लसन म्हणाला.

हेही वाचा : बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर, सर्वांत युवा जगज्जेत्या गुकेशची कास्पारोव्हकडून स्तुती

जगज्जेतेपद पटकावल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गुकेशने कार्लसनविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘‘जागतिक अजिंक्यपदाची लढत जिंकलो म्हणजे मी विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू झालो असे नाही. हा मान कार्लसनचा आहे. त्याच्याविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत खेळायला मला आवडेल,’’ असे गुकेश म्हणाला होता.

हेही वाचा : आनंदनंतरचा विश्वनाथ! सर्वांत तरुण बुद्धिबळ जगज्जेता डी. गुकेश

गुकेशची ही इच्छा आपण पूर्ण करू शकणार नसल्याचे कार्लसनने सांगितले. ‘‘मी या सर्कसचा पुन्हा भाग होऊ इच्छित नाही,’’ असे कार्लसनने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magnus carlson praises gukesh but deny to play with gukesh for world champion match css