स्नेहल शिंदेच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीगमधील महिलांच्या गटात अंतिम फेरी गाठली. त्यांनी उत्कंठापूर्ण लढतीत रत्नागिरी रेडर्स संघावर २७-१२ अशी मात केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने पूर्वार्धात २७-१२ अशी भक्कम आघाडी घेतली होती, मात्र उत्तरार्धात रत्नागिरी संघाने खोलवर चढाया व धारदार पकडी असा खेळ करीत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, ठाणे संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकविली. स्नेहल शिंदेने २६ गुण नोंदवत ठाण्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. आम्रपाली गलांडे व सोनाली इंगळे यांनी तिला चांगली साथ दिली. रत्नागिरी संघाकडून अपेक्षा टाकळेने एकटीने २० गुण मिळवत संघाला विजय मिळवून देण्यासाठी चिवट प्रयत्न केले.
अश्विनी शेवाळे व लता घरत यांनीही संघाचा पराभव टाळण्यासाठी झुंज दिली, परंतु त्यांचेही प्रयत्न अपुरे ठरले.
महिलांमध्ये ठाणे टायगर्स अंतिम फेरीत
स्नेहल शिंदेच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीगमधील महिलांच्या गटात अंतिम फेरी गाठली.
First published on: 13-06-2015 at 07:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kabaddi league