महाकबड्डी लीगमधील बाद फेरीचे सामने पुण्यातच होणार असून, एकदोन दिवसांत त्याची अंतिम कार्यक्रमपत्रिका निश्चित केली जाईल, असे या लीगचे मुख्य समन्वयक शांताराम जाधव यांनी सांगितले. या स्पर्धेतील बाद फेरीचे सामने गुरुवारपासून येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित केले जाणार होते. मात्र ज्या सभागृहात हे सामने आयोजित केले जाणार होते, त्याच सभागृहात ६ व ७ जून रोजी एका कंपनीचा कार्यक्रम या अगोदरच निश्चित झाला असल्यामुळे हे सभागृह आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही असे जाधव यांनी सांगितले. स्पर्धेच्या संयोजन समितीच्या बैठकीत स्पर्धेचे ठिकाण व तारखा निश्चित होतील.

Story img Loader