प्रो-कबड्डीच्या लक्षवेधी यशानंतर आता राज्यात महा-कबड्डीचे आयोजन केले जाणार आहे. १५ मे ते ७ जून या कालावधीत होणारया या महा कबड्डी लीग स्पध्रेत राज्यभरातील नामांकित खेळांडूंचा समावेष असणारे आठ पुरूष आणि आठ महिला संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मॅक्स गॉडविट यांच्यातर्फे  महा कबड्डी लीग खेळविली जाणार आहे. मुंबई, खेड, अलिबाग, पुणे येथे या लीगचे सामने खेळवले जाणार आहेत. १५ ते १८ मे या कालावधीत मुंबई येथे, २१ ते २४ मे दरम्यान खेड येथे, २८ ते ३१ मे दरम्यान अलिबाग येथे येथे साखळी सामने खेळवले जाणार आहेत. तर ४ ते ७ जून या कालावधीत बालेवाडी पुणे येथे उपांत्या फेरी, तृतीय क्रमांकाची लढत व अंतिम लढत होणार आहे. यात नगर चॅलेंजर, मुंबई डेविल्स, रायगड डायनामॉज, बारामती हरीकेन्स, पुणे पॅंन्थर्स, रत्नागिरी रायडर्स, सांगली रॉयल्स, ठाणे थंडर्स हे पुरूष व महिलांचे संघ या स्पध्रेत खेळणार आहेत. या सर्व संघांमध्ये महाराष्ट्रतीलच खेळाडू खेळणार आहेत.
यावर्षीपासून महा कबड्डी लीग खेळली जाणार आहे. तीन वर्षांसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. संघांच्या मालकांनी खेळाडू विकत घेतले आहेत. दर वर्षी या लीगचे दोन हंगाम (सिजन ) होतील . सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. प्रत्येक दिवशी पुरूष व महिलांचा प्रत्येकी एक असे दोनच सामने खेळले जाणार आहेत अशी माहिती मॅक्स गॉडविटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दर्थ मेहता यांनी अलिबाग येथे दिली. यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आस्वाद पाटील उपस्थित होते. महा कबड्डी लिग मधील आठ सामने अलिबाग येथे खेळवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  २८ ते ३१ मे या कालावधीत आरसीएफ क्रीडासंकूल कुरूळ – अलिबाग येथे हे सामने होणार असून एकाच वेळी जवळपास १० हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader