महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महाकबड्डी लीगला १५ मेपासून प्रारंभ होत आहे. या लीगकरिता घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या लिलावात महिलांपेक्षा पुरुष खेळाडूंना कमीच भाव मिळाला. पुरुषांमध्ये रत्नागिरीच्या कुलभूषण कुलकर्णीला सर्वाधिक एक लाख ८० हजार रुपयांचा भाव लाभला व त्याला रत्नागिरी फ्रँचायजीने विकत घेतले.
कुलभूषण याच्याखालोखाल ठाण्याच्या नीलेश साळुंखेला एक लाख ७८ हजार रुपयांची बोली मिळाली. त्याला ठाणे संघानेच विकत घेतले. विराज लांडगे व कुमार वागरे यांना प्रत्येकी एक लाख ४० हजार रुपयांची बोली
महाकबड्डी लीग दोन मोसमांमध्ये खेळवली जाणार आहे. पहिल्या मोसमातील सामने १५ ते ७ जून या कालावधीत मुंबई, खेड (रत्नागिरी), अलिबाग (रायगड) व पुणे या ठिकाणी खेळवले जातील. दुसऱ्या मोसमातील सामने नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ठाणे, बारामती, सांगली व अहमदनगर या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. पुरुष व महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी आठ संघांचा समावेश असून या संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होतील. प्रत्येक संघात दहा खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धेसाठी १५ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्काराप्रमाणेच स्पध्रेतील सर्वोत्तम अष्टपैलू, सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम पकडपटू आणि स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू अशी पारितोषिके ठेवण्यात येणार आहेत. सर्व सामने आंतरराष्ट्रीय मॅटवर होणार आहेत. पुण्यात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील व कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी कोषाध्यक्ष शांताराम जाधव, महाकबड्डी लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मेहता व मॅक्स गॉडवीटचे संचालक विजय सेठी हेही उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा