Maharaja Trophy T20 Hubli Tigers beat Bangalore Blasters in third Super Over : क्रिकेटमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे रोमांचक सामने पाहायला मिळतात, पण शुक्रवारी एक असा सामना खेळला गेला ज्याने उत्कंठेची उंची ओलांडली. महाराजा ट्रॉफी केएससीए टी-२० स्पर्धेतील बंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात हा सामना खेळला गेला. टी-२० सामन्यांमध्ये अनेकदा सुपर ओव्हर पाहायला मिळते, पण या सामन्यात सुपर ओव्हरचा विक्रम मोडला गेला. खरेतर, सामना टाय झाल्यानंतर, सलग दोन सुपर ओव्हरमध्ये पण सामना बरोबरीत राहिला आणि तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला.

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हर्स –

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हर्स पाहायला मिळाल्या. हा सामना सध्या सोशल मीडियावर त्याच्या ३ रोमांचक सुपर ओव्हर्समुळे चर्चेत आहे. वास्तविक, २३ ऑगस्ट रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर महाराजा टी-२० ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील बंगळुरूच्या ब्लास्टर्स आणि मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हुबळी टायगर्स संघाने २० षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या होत्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरू ब्लास्टर्सचा संघही २० षटकांत १६४ धांवावर गडगडला. ज्यामुळे सामना टाय झाला. यानंतर सामन्याचा निकाल लावण्यासाठी पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

सुपर ओव्हर्सची हॅट्ट्रिक –

या सामन्यातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करत १ गडी गमावून १० धावा केल्या होत्या. आता हा सामना जिंकण्यासाठी हुबलीला ११ धावा करायच्या होत्या, पण पुन्हा एकदा स्कोअर बरोबरीत राहिला. हुबलीचा संघही केवळ १० धावा करू शकला. ज्यामुळे आता सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला जिथे पुन्हा एकदा दोन्ही संघांचा स्कोअर बरोबरीत राहिला. या दुसऱ्या ओव्हरमध्ये हुबळी टायगर्सने ८ धावा केल्या आणि बंगळुरू ब्लास्टर्स संघाला १ गडी गमावून केवळ ८ धावा करता आल्या.

हेही वाचा – Shikhar Dhawan : टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा, भावनिक VIDEO शेअर करत जाहीर केली निवृत्ती

सलग दोन सुपर ओव्हरमध्ये स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर, तिसरी सुपर ओव्हर खेळली गेली. ज्यामध्ये बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना १ गडी बाद १२ धावा केल्या, मात्र, यावेळी प्रत्युत्तरात हुबळी टायगर्सने १३ धावा करत सामना जिंकला. अशाप्रकारे या रोमांचक सामन्याचा निकाल ३ सुपर ओव्हरमध्ये लागला.

Story img Loader