महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठण्यात अपयशास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील पुरुष गटात तेलंगणा संघाने उपांत्य फेरीत महाराष्ट्रावर २-० अशी मात केली. त्या वेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत ऑलिम्पिकपटू विष्णु वर्धन याने शहाबाज खान याचा ६-३, ७-६ (७-४) असा पराभव केला.साकेत मायनेनी या अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूने महाराष्ट्राच्या आकाश वाघ याला ७-६ (८-६), ६-३ असे पराभूत करीत तेलंगणास २-० असा विजय मिळवून दिला. महिलांमध्ये महाराष्ट्राला गुजरातने २-० असे हरविले.
एकेरीच्या पहिल्या सामन्यात गुजरातच्या इती मेहता हिने रश्मी तेलतुंबडे हिचा ६-४, ७-६ असा पराभव केला. अंकिता रैना या राष्ट्रीय अग्रमानांकित खेळाडूपुढे प्रार्थना ठोंबरे हिचा निभाव लागला नाही. एकतर्फी झालेला हा सामना अंकिताने ६-०, ६-१ असा जिंकला.
टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन कांस्य
महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठण्यात अपयशास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले.
First published on: 04-02-2015 at 12:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra get two bronze in tennis