सलामीवीर जय पांडे याचे नाबाद शतक व त्याने यासीर शेखच्या साथीत केलेली शतकी भागीदारी यामुळेच महाराष्ट्राने बडोदाविरुद्धच्या कूचबिहार करंडक (१९ वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात २ बाद २६७ असा शानदार प्रारंभ केला. हा सामना रविवारपासून बडोदा येथे सुरू झाला. प्रथम फलंदाजी घेणाऱ्या महाराष्ट्राने पहिला दिवस गाजविला. पांडे याने विजय झोल याच्या साथीत सलामीसाठी ८६ धावा केल्या. झोल याने नऊ चौकारांसह ४५ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या यासीरने पांडे याला चांगली साथ दिली. या जोडीने आत्मविश्वासाने खेळ करीत ५४.४ षटकांत १५७ धावांची भागीदारी केली. यासीरने आठ चौकारांबरोबरच दोन षटकार खेचून ८८ धावा केल्या.
पांडे याने एका बाजूने चिवट खेळ करीत नाबाद १११ धावा केल्या. २७३ चेंडूंमध्ये त्याने १९ चौकार मारले. खेळ संपला त्यावेळी शुभम रांजणे (नाबाद ७) त्याच्या साथीत खेळत होता.
जय पांडेच्या नाबाद शतकासह महाराष्ट्राचा शानदार प्रारंभ
सलामीवीर जय पांडे याचे नाबाद शतक व त्याने यासीर शेखच्या साथीत केलेली शतकी भागीदारी यामुळेच महाराष्ट्राने बडोदाविरुद्धच्या कूचबिहार करंडक (१९ वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात २ बाद २६७ असा शानदार प्रारंभ केला. हा सामना रविवारपासून बडोदा येथे सुरू झाला.
First published on: 14-01-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra glittering started with jay pandeys not out century