सलामीवीर जय पांडे याचे नाबाद शतक व त्याने यासीर शेखच्या साथीत केलेली शतकी भागीदारी यामुळेच महाराष्ट्राने बडोदाविरुद्धच्या कूचबिहार करंडक (१९ वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात २ बाद २६७ असा शानदार प्रारंभ केला. हा सामना रविवारपासून बडोदा येथे सुरू झाला. प्रथम फलंदाजी घेणाऱ्या महाराष्ट्राने पहिला दिवस गाजविला. पांडे याने विजय झोल याच्या साथीत सलामीसाठी ८६ धावा केल्या. झोल याने नऊ चौकारांसह ४५ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या यासीरने पांडे याला चांगली साथ दिली. या जोडीने आत्मविश्वासाने खेळ करीत ५४.४ षटकांत १५७ धावांची भागीदारी केली. यासीरने आठ चौकारांबरोबरच दोन षटकार खेचून ८८ धावा केल्या.
पांडे याने एका बाजूने चिवट खेळ करीत नाबाद १११ धावा केल्या. २७३ चेंडूंमध्ये त्याने १९ चौकार मारले. खेळ संपला त्यावेळी शुभम रांजणे (नाबाद ७) त्याच्या साथीत खेळत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा