संतोष करंडक फुटबॉल
सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राला संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी गुरुवारी केरळच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
या स्पर्धेत चार वेळा अजिंक्यपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीच्या साखळी गटात झारखंड, गोवा व तामिळनाडू यांच्यावर विजय मिळविताना दमदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्राने १३ वर्षांपूर्वी या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
केरळ संघाला अनुकूल वातावरण व घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा मिळणार आहे. केरळचे प्रशिक्षक एम. एम. जेकब यांनी सांगितले, ‘‘घरच्या प्रेक्षकांचे प्रोत्साहन ही आमची जमेची बाजू आहे. आमच्या चाहत्यांची निराशा आम्ही करणार नाही. अर्थात महाराष्ट्राला आम्ही कमी लेखणार नाही. त्यांचे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.’’ महाराष्ट्राचे प्रशिक्षक फारुक अहमद यांनी जेकब यांच्या मताशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हा सामना गांभीर्याने घेणार आहोत. आमचे खेळाडू केरळचे आव्हान स्वीकारण्यासाठी उत्सुक असून शेवटपर्यंत सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ’’

Story img Loader