अहमद काद्री याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर हैदराबादने महाराष्ट्रविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले. हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ९ बाद ६१६ (घोषित) धावांना उत्तर देताना हैदराबादने शेवटच्या दिवसअखेर ७ बाद ५२८ धावा केल्या. त्यांनी ४ बाद २९० धावांवर पहिला डाव रविवारी पुढे सुरू केला. त्यावेळी महाराष्ट्राचे गोलंदाज त्यांचे उर्वरित सहा बळी घेत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळविणार की नाही याबाबत उत्सुकता होती. तथापि गगन हनुमा विहारी व काद्री यांनी पाचव्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या अपेक्षा फोल ठरविल्या.
‘‘खेळाचा आनंद लुटता येईल तोपर्यंत खेळत राहीन असे ठरवले होते. ज्यावेळी आता थांबायला हवे असे मनापासून वाटले तेव्हा थांबलो. २४ वर्षांत अनेक दुखापती झाल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. परंतु शरीर शेवट आता खूप झाले असे सांगते. माझे शरीर सातत्याने हे आव्हानांचे ओझे पेलत होते.’’