हॉकी इंडियाचे सरचिटणीसपदाची जबाबदारी यशस्वी रीत्या सांभाळणारे डॉ.नरेंद्र बात्रा यांची संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी महंमद मुश्ताक अहमद तर खजिनदारपदी राजिंदरसिंग यांची निवड झाली आहे. संघटनेच्या वार्षिक सभेत विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अगोदरच्या कार्यकारिणीत हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काम करणाऱ्या मनोज भोरे यांना हॉकी इंडियाच्या नवीन कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.
सर्वात प्रशंसनीय सदस्य संघटना म्हणून हॉकी कर्नाटकची निवड करण्यात आली तर सर्वात कार्यक्षम कर्मचारी म्हणून हॉकी इंडियाचे आशिष कुलश्रेष्ठ यांना पारितोषिक देण्यात आले.
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष-डॉ.नरेंद्र बात्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष-मरियामा कोशी, उपाध्यक्ष-गायत्री शेट्टी, शोभासिंग, तपनकुमार दास, आनंदेश्वर पांडे. सरचिटणीस-महंमद मुश्ताक अहमद, खजिनदार-राजिंदरसिंग. सहसचिव-आशा ठाकूर, असिमा अली, किशोरसिंग बाफीला, हितेश सिंदवानी. कार्यकारिणी सदस्य-मधु कटय़ाल, आसुंता लाक्रा, ग्यानेंद्र निंगोम्बम, फिरोझ अन्सारी, व्ही.ए.शियाद.

Story img Loader