बंगळुरू येथे सुरू असलेल्या ४८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दिल्लीचे आव्हान १२-८ असे मोडीत काढले. विजयी संघाकडून नरेश सावंत (२.३० मि.), दिपेश मोरे (२.४० मि.), रमेश सावंत (२.२० मि.) व मयुरेश साळूंके (२ मि.) , मििलद चावरेकर (२.३० मि.) व युवराज जाधव (३ बळी) यांनी सुरेख खेळ केला. महिला संघाने मध्य भारत संघाला १३-४ अशी धूळ चारली. महाराष्ट्राच्या श्रुती सकपाळ, प्रियांका भोपी, निकिता पवार यांनी प्रत्येकी ४ मि. संरक्षण केले, तसेच शिल्पा जाधव व मीनल भोईर यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले.

Story img Loader