अहमदनगर येथे सुरू असलेल्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात विशाल माने (६५ किलो, कोल्हापूर) व प्रकाश कोळेकर (५७ किलो, सांगली) तर माती विभागात सागर मारकड (६५ किलो, पुणे शहर) व आबासाहेब मदने (५७ किलो, सोलापूर) या मल्लांनी पहिल्याच दिवशी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
६५ किलोच्या अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल मानेने लौकिकाला साजेशा खेळ करत मुंबईच्या संजय पाटीलला ९-२ अशा फरकाने पराभूत केले. नगरच्या किरण नलावडेचा माने याने उपांत्य फेरीतच पराभव केला. ५७ किलोमध्ये सांगलीच्या कोळेकरने पुणे शहरच्या शितोळेचा ४-२ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निकाल पुढीलप्रमाणे :
मॅट विभाग: ५७ किलो: प्रकाश कोळेकर (सुवर्ण), तुकाराम शितोळे (रौप्य, पुणे शहर), स्वप्नील शेलार (कांस्य, पुणे जिल्हा) व आबासाहेब अटकाळे (चतुर्थ, सोलापूर). ६५ किलो: विशाल माने (सुवर्ण), संजय पाटील (रौप्य, मुंबई शहर), सागर लोखंडे (कांस्य, पुणे जिल्हा) व शिवाजी भोसले (चतुर्थ, सोलापूर).
माती विभाग : ५७ किलो: सागर मारकड (सुवर्ण), विकास पाटील (रौप्य, कोल्हापुर), ज्योतिबा अटकळे (कांस्य, सोलापूर). ६५ किलो-आबासाहेब मदने (सुवर्ण),दिनेश मोकाशी (रौप्य, पुणे जिल्हा) व राम कांबळे (कांस्य, कोल्हापूर).