पुण्यात आज(शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा – PHOTOS : ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा पटकावण्यासाठी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कुस्तीच्या आखाड्यात रंगला थरार!!!

नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता.

हेही वाचा – महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.

अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.

पाहा व्हिडीओ –

महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे. तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kesari 2023 shivraj rakshe wins maharashtra kesari wrestling tournament msr