Maharashtra Kesari 2023: पुण्यात झालेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला त्यात नांदेडचा शिवराज राक्षे विजयी ठरला. शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. या स्पर्धेला कुस्ती चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शिवराज राक्षे याने आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलताना सांगितले की आता माझे पुढचे लक्ष हे २०२४चे पॅरिस ऑलिम्पिक असणार असून त्यादृष्टीने त्याने तशी तयारी सुरु केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते यावर त्याने महाराष्ट्र सरकारचे देखील आभार मानले. २०१७ साली तो महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत आपले कौशल्य आजमावण्यासाठी आला होता. मात्र त्याला दुखापत झाल्याने तो त्यातून बाहेर पडला होता. मात्र अशा अनेक दुखापतींवर मात करत अथक परिश्रमाने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात पुनरागमन केले आणि मानाची गदा यावर्षी पटकावली. यावर तो म्हणाला की, “ टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. दुखापती या होतच असतात मग तो कुठलाही खेळ असो पण त्यातून बाहेर पडणे महत्वाचे असते. पोलीस भरती, आर्मीची परीक्षा देताना देखील अनेक मुलांना दुखापती होतच असतात त्यामुळे आपण कसे तोंड देतो हे फार महत्वाचे आहे.”

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
ballarpur assembly, abhilasha gavture, sudhir mungantiwar, santosh singh ravat,
गावतुरे यांच्या बंडखोरीने बल्लारपूरमध्ये काँग्रेस अडचणीत
Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah in the state of Maharashtra to campaign for the assembly elections
नरेंद्र मोदी, अमित शहा आजपासून राज्यात; पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात १० सभा

हेही वाचा: Maharashtra Kesari 2023: “माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सपण नाही…”, भेट मिळालेल्या महिंद्रा ‘थार’ विषयी शिवराजने केली मिश्कील टिप्पणी

आता पुढचे लक्ष २०२४चे पॅरिस ऑलिम्पिक

ज्यावेळी त्याला विचारण्यात आले की तुझे पुढचे ध्येय काय आहे? यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “ माझे पुढचे ध्येय हे २०२४चे पॅरिस ऑलिम्पिक असणार असून खाशाबा जाधवांनंतर कोणीही महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक पदक आणले नाही. पण मी सुवर्णपदक घेऊनच येणार अशी मला खात्री आहे.” पुढे तो बोलताना म्हणाला की, “ शिवाजी महाराजांनी कधीच जात-धर्म-पंथ यात भेदभाव केला नाही आणि त्यांनी दिलेली शिकवणंच मी माझ्या आयुष्यात आचरणात आणली आहे.”

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI: “त्याला काही करू नका…!” रोहितची क्रेझ, चाहत्याची मिठी युवा फॅन live सामन्यात घुसला अन्…

शिवराज राक्षे पुढे बोलताना म्हणाला की, “‘भाग मिल्खा भाग’, ’दंगल’ असे चित्रपट बघून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यातूनच मी महाराष्ट्र कुस्तीची गदा जिंकण्यात यशस्वी झालो.” तसेच त्याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यातील वादावर विचारलेल्या प्रश्नांना सराईतपणे बगल देत ताकास तूर लागू दिला नाही.