Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe Mahendra Gaikwad : अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषदेने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला होता. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात ४० सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यानी पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली. त्यमुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात अवघ्या ४० सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराजला आपटलं. त्यानंतर पचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केलं. मात्र शिवराजने, त्याच्या प्रशिक्षकांनी व इतर उपस्थितांनी दावा केला आहे की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते. शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली. मात्र पचांनी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी शिवराजने गोंधळ घातला. मैदानात धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता. शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली. अर्ध्या तासाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते. मात्र हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने पंचांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ महेंद्रने थेट मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. दरम्यान, शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने या दोघांना तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी टीव्ही ९ मराठीला याबाबतची माहिती दिली.

Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
neelam gorhe marathi news
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल – डॉ. नीलम गोऱ्हे
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
Bangladeshis and Rohingya muslims latest news
मालेगाव : उशिराने जन्म, मृत्यू प्रमाणपत्रास स्थगिती; घुसखोरीच्या आरोपांनंतर सरकारचा निर्णय

शिवराज राक्षेचा निकालावर आक्षेप

दरम्यान, शिवराज राक्षे याने सामन्याचा रिव्ह्यू करण्याची मागमी केली आहे. तसेच त्याने म्हटलं आहे की माझे खांदे जमिनीला टेकल्याचं दिसलं तर मी माझा पराभव स्वीकारेन.

Story img Loader