तब्बल ३५ वर्षांनंतर नगरला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाना गुरुवारपासून येथील कै. पै. छबुराव लांडगे क्रीडानगरीत सुरुवात होणार आहे. राज्यातील ४४ जिल्ह्य़ांच्या संघातील मल्ल मंगळवारीच येथे दाखल झाले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र केसरी पदासाठी चांदीची गदा व एक लाख रुपये, तर उपविजेत्यासाठी ५१ हजार रुपये अशी पारितोषिके आहेत.

Story img Loader