बंगळुरू येथे सुरू असलेल्या ४८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी आपापले सामने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने आपली निश्चयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
पुरुषांमध्ये महाराष्ट्राने चंदिगढचा २०-२ असा एक डाव व १८ गुणांनी धुव्वा उडवला. नरेश सावंत (३.३० मि. व ५ गडी) , दीपेश मोरे (२ मि. नाबाद व १ गडी), रमेश सावंत (३.३० मि. व ३ गडी) व तुषार मांढरे (३ गडी) हे विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने हरयाणावर १२-२ असा एक डाव व १० गुणांनी विजय नोंदवला. या विजयात नरेश सावंत व दीपेश मोरे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच कर्णधार मििलद चावरेकरने तीन गडी बाद केले. महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणचा १४-६ असा एक डाव व ८ गुणांनी पराभव करून खाते उघडले. विजयी संघाच्या निकिता पवार (३.३० मि.), ऐश्वर्या सावंत (४.१० मि.), पौर्णिमा सकपाळ (३ मि.), श्रुती सकपाळ (२.४० मि.) व मिनल भोईर (३ गडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
महाराष्ट्राची विजयी घोडदौड
बंगळुरू येथे सुरू असलेल्या ४८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी आपापले सामने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने आपली निश्चयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
First published on: 10-01-2015 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kho kho