बंगळुरू येथे सुरू असलेल्या ४८व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी आपापले सामने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने आपली निश्चयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
पुरुषांमध्ये महाराष्ट्राने चंदिगढचा २०-२ असा एक डाव व १८ गुणांनी धुव्वा उडवला. नरेश सावंत (३.३० मि. व ५ गडी) , दीपेश मोरे (२ मि. नाबाद व १ गडी), रमेश सावंत (३.३० मि. व ३ गडी) व तुषार मांढरे (३ गडी) हे विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने हरयाणावर १२-२ असा एक डाव व १० गुणांनी विजय नोंदवला. या विजयात नरेश सावंत  व दीपेश मोरे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच कर्णधार मििलद चावरेकरने तीन गडी बाद केले. महाराष्ट्राच्या महिला संघाने तेलंगणचा १४-६ असा एक डाव व ८ गुणांनी पराभव करून खाते उघडले. विजयी संघाच्या निकिता पवार (३.३० मि.), ऐश्वर्या सावंत (४.१० मि.), पौर्णिमा सकपाळ (३ मि.), श्रुती सकपाळ (२.४० मि.) व मिनल भोईर (३ गडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kho kho