मुंबई रायडर्सचे नेतृत्व मनोज वैद्यकडे
सहाही संघांना मिळाले फ्रँचाइजी; सर्व संघ जाहीर
पहिल्यावहिल्या खो-खो प्रीमियर लीगच्या सहाही संघांचे ऐलान झाले आहे. महाराष्ट्रातील ७८ अव्वल दर्जाच्या खेळाडूंना या सहा संघांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. मुंबई रायडर्सचे कर्णधारपद मनोज वैद्यकडे सोपविण्यात आले असून, राहुल तामगावे (सबर्बन योद्धाज), कुणाल वाईकर (पुणे फायटर्स), विलास करंडे (ठाणे थंडर्स), युवराज जाधव (सांगली स्मॅशर्स) आणि अमोल जाधव (अहमदनगर हीरोज) हे खेळाडूही अन्य संघांचे नेतृत्व सांभाळणार आहेत.
येत्या ११ ते १४ एप्रिलदरम्यान शिवाजी पार्कच्या मैदानावर रंगणारा खो खोच्या प्रीमियर लीगचा पहिला प्रयोग दमदार व्हावा म्हणून आयोजक गुंता ग्रुप आणि डी. डी. अॅडव्हर्टायझिंग सज्ज झाले आहेत. शिवाजी पार्कवर साधारणत: पाच हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे खेळाडूंचाही दर्जेदार खेळ पाहायला मिळू शकेल.
महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीगचे संघ पुढीलप्रमाणे
मुंबई रायडर्स
फ्रँचायजी : आमदार भाई जगताप
प्रशिक्षक : पांडुरंग परब
कर्णधार : मनोज वैद्य
संघ : मनोज पवार, मिलिंद चावरेकर, सुनील मोरे, पवन घाग, सुरेश सावंत, विनायक दळवी, कुशल शिंदे, किरण कांबळे, सिद्धेश कदम, श्रेयस राऊळ, अनिकेत चराटे, रुपेश वाडकर.
सांगली स्मॅशर्स
फ्रँचायजी : एफ.पी.ए. इंटरप्रायजेस
प्रशिक्षक : दीपक राणे
कर्णधार : युवराज जाधव
संघ : तेजस शिरसकर, किरण सावंत, अमित परब, विकास शिरगावकर, अमित मांडवकर, रोहन भागले, पुनीत पाटील, श्रीकांत वल्लकट्टी, पराग परब, फरहान जहागिरदार, रोहित कांबळे.
ठाणे थंडर्स
फ्रँचायजी : वैशाली लोंढे
प्रशिक्षक : नितीन जाधव
कर्णधार : विलास करंडे
संघ : तक्षक गौडांजे, रजनाज शेट्टी, सागर मालप, सचिन पालकर, उमेश पालकर, प्रणय राऊळ, अनिल पिसाळ, उत्तम सावंत, प्रवीण शिंदे, सागर तेरवणकर, दाऊद शेख, सुश्रूत मोरे.
अहमदनगर हीरोज
फ्रेंचायझी : पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक महेश लांडगे
प्रशिक्षक : सुधाकर राऊळ
कर्णधार : अमल जाधव
संघ : अमोल सावंत, मनीष बडांबे, प्रशांत इंगळे, सुजीत पाटील, दीपेश मोरे, विकास परदेशी, अनुप परब, तुषार मांढरे, सागर गडदे, अविनाश शेंगुळे, तेजस अमीन, तुषार रावले.
पुणे फायटर्स
फ्रेंचायझी : बाबुराव चांदेरे
प्रशिक्षक : नरेंद्र शहा
कर्णधार : कुणाल वायकर
संघ : अक्षया निंबरे, मयप्पा हीरेकुर्ब, शीतल पाटील, निशिकांत शिंदे, गणेश सावंत, प्रमोद साखरपे, संतोष वाडेकर, दीपक माने, सागर कठारे, बालाजी चव्हाण, निकेत राऊत, नितीन ढोबळे.
मुंबई सबर्बन योद्धाज
फ्रेंचायझी : आमदार आशिष शेलार
प्रशिक्षक : बिपीन पाटील
कर्णधार : राहुल तामगावे
संघ : प्रताप शेलार, निचिकेत जाधव, स्नेहल बागकर, रंजन मोहिते, रमेश सावंत, चेतन माने, रुपेश खेतले, राहुल उइके, अभिषेक कागडा, चेतन गवस, विठ्ठल पवार, रोशन भोईर.