मुंबई रायडर्सचे नेतृत्व मनोज वैद्यकडे
सहाही संघांना मिळाले फ्रँचाइजी; सर्व संघ जाहीर
पहिल्यावहिल्या खो-खो प्रीमियर लीगच्या सहाही संघांचे ऐलान झाले आहे. महाराष्ट्रातील ७८ अव्वल दर्जाच्या खेळाडूंना या सहा संघांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. मुंबई रायडर्सचे कर्णधारपद मनोज वैद्यकडे सोपविण्यात आले असून, राहुल तामगावे (सबर्बन योद्धाज), कुणाल वाईकर (पुणे फायटर्स), विलास करंडे (ठाणे थंडर्स), युवराज जाधव (सांगली स्मॅशर्स) आणि अमोल जाधव (अहमदनगर हीरोज) हे खेळाडूही अन्य संघांचे नेतृत्व सांभाळणार आहेत.
येत्या ११ ते १४ एप्रिलदरम्यान शिवाजी पार्कच्या मैदानावर रंगणारा खो खोच्या प्रीमियर लीगचा पहिला प्रयोग दमदार व्हावा म्हणून आयोजक गुंता ग्रुप आणि डी. डी. अॅडव्हर्टायझिंग सज्ज झाले आहेत. शिवाजी पार्कवर साधारणत: पाच हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्यामुळे खेळाडूंचाही दर्जेदार खेळ पाहायला मिळू शकेल.
महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीगचे संघ पुढीलप्रमाणे
मुंबई रायडर्स
फ्रँचायजी : आमदार भाई जगताप
प्रशिक्षक : पांडुरंग परब
कर्णधार : मनोज वैद्य
संघ : मनोज पवार, मिलिंद चावरेकर, सुनील मोरे, पवन घाग, सुरेश सावंत, विनायक दळवी, कुशल शिंदे, किरण कांबळे, सिद्धेश कदम, श्रेयस राऊळ, अनिकेत चराटे, रुपेश वाडकर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा