पश्चिम विभागीय आंतरराज्य एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व रोहित मोटवानी याच्याकडेच ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा येथे १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत येथे होत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने हा संघ जाहीर केला. महाराष्ट्राची १४ फेब्रुवारी रोजी गुजरातशी गाठ पडणार आहे. त्यानंतर त्यांना सौराष्ट्र (१५ फेब्रुवारी), मुंबई (१८ फेब्रुवारी) व बडोदा (२० फेब्रुवारी) यांच्याशी खेळावे लागणार आहे. या स्पर्धेतील सामने पूना क्लब व गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहेत.
महाराष्ट्र संघ-रोहित मोटवानी (कर्णधार), हर्षद खडीवाले, चिराग खुराणा, संग्राम अतितकर, केदार जाधव, अंकित बावणे, प्रयाग भाटी, श्रीकांत मुंढे, राहुल त्रिपाठी, समाद फल्लाह, अक्षय दरेकर, डॉमिनिक मुथुस्वामी, सचिन चौधरी, विजय झोल, निखिल नाईक, भरत सोळंकी.
सामन्यांची कार्यक्रमपत्रिका-१४ फेब्रुवारी-मुंबई वि.बडोदा गहुंजे येथे सकाळी नऊ वाजता. महाराष्ट्र वि. गुजरात- पूना क्लब-सकाळी नऊ वाजता. १५ फेब्रुवारी-महाराष्ट्र वि. सौराष्ट्र-गहुंजे येथे सकाळी नऊ वाजता. मुंबई वि. गुजरात पूना क्लब-सकाळी नऊ वाजता. १७ फेब्रुवारी-मुंबई वि.सौराष्ट्र्-पूना क्लब येथे सकाळी नऊ वाजता. बडोदा वि. गुजरात- गहुंजे येथे-दुपारी बारा वाजता. १८ फेब्रुवारी-बडोदा वि.सौराष्ट्र-पूना क्लब-सकाळी नऊ वाजता. महाराष्ट्र वि. मुंबई-गहुंजे येथे-दुपारी अडीच वाजता. २० फेब्रुवारी-सौराष्ट्र वि. गुजरात-गहुंजे येथे दुपारी अडीच वाजता. महाराष्ट्र वि. बडोदा-पूना क्लब येथे सकाळी नऊ वाजता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा