MPL 2023 Kolhapur Tuskers vs Ratnagiri Jets: महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ मधील चौथा सामना आज कोल्हापूर टस्कर्स आणि रत्नागिरी जेट्स संघांत खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर संध्याकाळी आठला सुरु होणार आहे. या सामन्यात कोल्हापूर टस्कर्सचे नेतृत्त्व केदार जाधव, तर अझीम काझी रत्नागिरी जेट्सचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
कोल्हापूर टस्कर्सला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रत्नागिरी जेट्सने शेवटचा सामना जिंकला होता आणि संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळला जाणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमींग डीडी स्पोर्ट्स आणि फॅनकोड अॅपवर पाहता येणार आहे.
खेळपट्टीचा अहवाल –
क्रिकेट एसोसिएशन स्टेडियमचा ट्रॅक गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक अनुकूल आहे. फलंदाज खेळपट्टीच्या उसळीवर विश्वास ठेवू शकतात आणि त्यांचे शॉट्स मुक्तपणे खेळू शकतात. गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी आणि फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी घट्ट रेषा आणि लांबीवर अवलंबून रहावे लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाला येथे पाठलाग करायला आवडेल. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी १५३ धावांची आहे.
हेही वाचा – Danish Kaneria: “तुम्ही यू टर्न घेण्याची सवय कधी सोडणार?”; माजी खेळाडूने PCB वर उपस्थित केला सवाल
कोल्हापूर टस्कर्स संघ:
केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, कीर्तिराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, आत्मन पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तरनजीत धिल्लॉं, निहाल तुसामद, रवी चौधरी, अंकित बावणे, सचिन धस, निहाल मदास, साहिल औताडे.
रत्नागिरी जेट्स संघ:
अझीम काझी (कर्णधार), विजय पावले, दिव्यांग हिंगणेकर, आश्कान काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप धाडे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे, शाहरुख कादीर, योगेश चव्हाण, तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अखिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, ऋषिकेश सोनवणे, समर्थ कदम, निखिल नाईक.