Maharashtra Shaurya Ambure won gold medal in National Games: अेम स्पोर्ट्स फाऊंडेशनसाठी अभिमानास्पद क्षण. जी अेम स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू महाराष्ट्राची शौर्या आंबुरे कोच हिने भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित ३९व्या नॅशनल ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये ६० मीटर व ८० मीटर अडथळा शर्यतीत मुलींच्या अंडर-१६ गटात सुवर्णपदक पटकावले आहे. मेडले रिले मध्ये महाराष्ट्राचा संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात शौर्याचा मोलाचा वाटा आहे. शौर्या अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
शौर्याने ६० मीटर शर्यतीत ७.६० सेकंद वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय आणि स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला, जो आधीचा ७.७७ सेकंदाचा विक्रम होता. ह्या कामगिरीसाठी शौर्याला राष्ट्रीय स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
शौर्या ही युनिव्हर्सल हायस्कूल ठाणे या शाळेची विद्यार्थिनी असून गेल्या ८ वर्षांपासून वसंत विहार क्लब ग्राउंड येथे सराव करत आहे. तिचे आई-वडील, दोघेही DCP असून, त्यांनी नेहमीच तिच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अेम स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सर्व प्रशिक्षक, तिचे कुटुंब आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी ही कामगिरी आहे. शौर्या, तिच्या अभिमानी पालकांना आणि अेम कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!