भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाशी कसोटी मालिकेत दोन हात करण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी त्याकडे लक्ष हात लावून आहेत. पण याबरोबरच भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक विषय तितकाच चघळला जात आहे. तो म्हणजे मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यामधील वाद. या वादावर महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी हे प्रकरण म्हणजे खेळातच राजकारण असल्याचा प्रकार आहे, असे मत व्यक्त केले आहे.

एखाद्या निवडणूकीमध्ये पराभव झाला की जरा लगेच उमेदवाराला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारा असे सांगितले जाते. पण या प्रकरणाकडे पहिले तर हे सध्याच्या घडीला क्रीडा क्षेत्रामध्येच राजकारण जास्त पाहायला मिळत आहे. महिला क्रिकेटमधील राजकारणाबाबत मी काही बातम्या वाचल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण BCCI ने लवकरात लवकर सोडवायला हवी, असे ते म्हणाले.

मितालीने पोवार यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. तसेच पोवार यांनी अपमान केल्याचाही तिने पत्रात लिहिले होते. त्यानंतर मितालीसोबत आपले तणावपूर्ण संबंध आहेत. तिला सांभाळणे कठीण आहे. ती फार वेगळ्या प्रकारची खेळाडू आहे. मिताली ही एकाकी राहणारी खेळाडू असून तिला आवरणे शक्य होत नाही. तिला उपांत्य फेरीतील सामन्यातून वगळणे हा सांघिक निर्णय होता.

Story img Loader