Maharashtra State Olympic Competitionऑलिम्पिकपटू आणि आशियाई सुवर्णपदक विजेत्या दत्तू भोकनळच्या नेतृत्वाखाली पुणे संघाने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत नौकानयनात १५ पैकी आठ सुवर्णपदकांची नोंद करत पदकतालिकेमध्ये आघाडी घेतली. पुण्याच्या खात्यावर ४२ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४१ कांस्यपदके आहेत.भोकनळने सिंगल स्कल्समध्ये सुवर्णपदक पटकावले. ‘एमआयटी’च्या विद्यार्थाचाही या यशात मोठा वाटा होता. त्यांच्या अनुष्का गर्जे, भाग्यश्री घुले यांनी महिलांच्या विभागात दुहेरीत सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर भाग्यश्री, अनुष्काने वैदेही देवी आणि हर्षिता पाटील यांच्यासह चौघांच्या गटात कांस्यपदक जिंकले. आठ जणांच्या सांघिक प्रकारात त्यांना नेहा बधे, आर्या तुपे, अनामिका आर्या, साक्षी काकडे यांची साथ मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेटलिफ्टगमध्ये कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने महिलांच्या ५९ किलो वजनी गटात एकूण १८१ किलो वजन उचलून सोनेरी यश मिळवले. डायिव्हगमध्ये सोलापूरच्या ईशा वाघमोडेने ३ मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात सुवर्णपदक पटकावले. पुरुष विभागात मुंबईचा रोहन स्ब्रानी सोनेरी यशाचा मानकरी ठरला. वुशू प्रकारात पुण्याच्या तेजस राऊतने सुवर्ण यश संपादन केले.

जलतरणात ८०० मीटर फ्री-स्टाईलमध्ये ठाण्याच्या ऋषभ दासने ९ मिनिटे ११.५ सेकंदासह सुवर्णपदक मिळवले. १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मुंबईच्या दीपक पाटीलने बाजी मारली. २०० मीटर बटरफ्लाय शर्यत पुण्याच्या तनिष्क कुदळेने जिंकली. मुंबईच्या हीर शहाने ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. महिला विभागात ज्योती पाटील, ठाण्याची राघवी रामानुजन , प्रतिशा डांगी यांनी सोनेरी यश मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra state olympic competition pune leads the medal table with eight gold medals in sailing amy
Show comments