महाराष्ट्र कामगार मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कामगार व कुमार केसरी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवशी योगेश पाटील, सुनील शेवतकर आणि प्रकाश कोळेकर यांनी विजयी सलामी दिली. कामगार केसरी गटामध्ये सुनील व अविनाश सूर्यवंशी यांच्यातील लढत चांगलीच रंगली. दोघांनीही एकमेकांवर डाव टाकत २.५५ मिनिटे चाललेल्या थरारामध्ये अखेर सुनीलने बाजी मारली. या गटामध्येच योगेश पाटीलने स्वप्निलवर मात केली. कुमार केसरी गटातील प्राथमिक लढतीमध्ये प्रकाश कोळेकरने सांगलीच्याच शशिकांत पाटीलवर सहजपणे मात केली.
अन्य गटवार निकाल
कामगार केसरी : सतिश पाटील वि.वि.रवींद्र पाटील.
कुमार केसरी : नितीन पाटील वि.वि. विजय पाटील, बापू कोळेकर वि.वि. किरण पावले, सूरज पाटील वि.वि. आजेश पाटील.
५५ कि.पर्यंत : वैभव जाधव वि.वि. नरेंद्र गायकवाड, संदीप पाटील वि.वि. सुनील फारणे.
६० कि.पर्यंत : सुमित शिंदे वि.वि. रंगराव शेडगे, शंकर वाळके वि.वि. प्रवीण पाटील, प्रवीण जाधव वि.वि. महेश पाटील, मछिंद्र पाटील वि.वि. वैभव बंगडे.
६६ कि. पर्यंत : दिग्विजय जाधव वि.वि. सूरज चौगुले.

Story img Loader