राष्ट्रीय अजिंक्यपद वरिष्ठ खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने विजयी सलामी देत स्पध्रेत दणक्यात सुरुवात केली. सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पध्रेत पुरुष गटात रेल्वेने, तर महिला गटात कोल्हापूरने एकतर्फी विजयासह आगेकूच केली.
महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशाचा २०-४ असा एक डाव १६ गुणांनी पराभव केला. महिला गटात सारिका काळे (२.५० मि. व २ गुण) व ऐश्वर्या सावंत (१.३० मि. व २ गुण) यांनी अष्टपलू कामगिरी केली. प्रियांका भोपी (३.०० मिनिटे) संरक्षणात साथ दिली. शीतल भोईर, सुप्रिया गाढवे व आरती कांबळे यांनी आपल्या आक्रमणात प्रत्येकी ४ बळी टिपले. पुरुष गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा २५-३ असा एक डाव २२ गुणांनी दारुण पराभव केला. अष्टपैलू खेळ करणारा नरेश सावंत पुरुष संघाच्या विजयाचा मानकरी ठरला. त्याने धारदार आक्रमणात सहा गडी बाद करीत २.३० मिनिटे पळतीचा खेळ केला. त्याला महेश िशदे (२.३० मिनिटे) व दीपक माने यांनी संरक्षणात, तर युवराज जाधव (४ गुण) व मिलिंद चवरेकरने (६ गुण) आक्रमणात साथ दिली.
गतविजेत्या रेल्वेने तामिळनाडूवर १७-६ असे निर्वविाद वर्चस्व गाजवले. त्यांच्या आनंदकुमार (३.३० मि. व २ गुण), महेश माळगे (२.३० मि. व ३ गुण) व मनोज पवार (२.१० मि. व २ गुण) यांनी अष्टपलू कामगिरी केली. कोल्हापूरच्या महिलांनी मध्य प्रदेशवर १०-३ अशी डावाने मात केली. करिश्मा रिकीबदार ( ४.०० मि. व ३ गुण), तर अमृत कोकीटकर (५.०० व ३ गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

Story img Loader